मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (12:59 IST)

जबलपुरमधील ऑर्डिनेंस फॅक्टरीमध्ये स्फोट, 15 जण जखमी

ambulance
मध्‍य प्रदेश मधील जबलपुरच्या ऑर्डिनेंस फॅक्टरीमध्ये मोठा भीषण स्फोट झाला असून यामध्ये 15 जण गंभीर जखमी झाले आहे. सांगितले जाते आहे की, हा स्फोट खमरियाच्या फीलिंग सेक्‍शन-6 मध्ये झाला आहे. तसेच हा स्फोट कसा झाला याचे कारण अजून समजले नाही आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयअंतर्गत ऑर्डिनेंस फॅक्टरीत खमरिया मध्ये बॉंम्ब आणि विस्फोटक साहित्य तयार करण्यात येते. हा स्फोट सकाळी 10:30 वाजता झाला असे सांगण्यात येत आहे. 
 
ऑर्डिनेंस फॅक्टरीच्या अधिकारींनी सांगितले की, जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.  तसेच त्यांनी सांगितले की, फॅक्टरीच्या री-फिलिंग सेक्शन मध्ये झालेल्या स्फोटात 10 ते 12 जण देखील जखमी झाले आहे. तसेच अधिकारींनी सांगितले की, एक व्यक्ती बेपत्ता आहे. 
 
जबलपुरच्या ऑर्डिनेंस फॅक्टरी मध्ये स्फोटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांना जवळच्या महाकौशल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. जबलपुर ऑर्डिनेंस फॅक्टरी की स्थापना ब्रिटिश काळात झाली असून ही फॅक्टरी भारतीय सेने करिता हत्यार आणि दारूगोळा बनवण्याचे काम करते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या फॅक्टरीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले व भारत सरकारच्या अधीन करण्यात आले. 

Edited By- Dhanashri Naik