सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (14:24 IST)

डोंगरावरून सेल्फी घेताना महिला 70 फूट खाली कोसळली

हरिद्वारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरिद्वारमध्ये मनसादेवीच्या दर्शनासाठी गेलेली महिला 70 फूट उंच डोंगरावरून खाली पडली. सेल्फी काढताना हा अपघात झाला. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळलेल्या माहितीनुसार सेल्फी काढत असताना 28 वर्षीय महिला अचानक टेकडीवरून खाली 70 फूट उंच डोंगरावरून पडल्याने महिलेची प्रकृती चिंताजन आहे असे सांगण्यात येत आहे. अनेक वेळा सोशल मीडियावर काही लाइक्स आणि कमेंट्स गोळा करण्यासाठी लोक जीवाची पर्वाही करत नाहीत. असेच एक उदाहरण हरिद्वारच्या मनसादेवी मंदिराजवळ घडले आहे. कुटुंबासह मनसादेवीच्या दर्शनासाठी आलेली महिला डोंगराजवळ सेल्फी घेत होती. अचानक पाय घसरला आणि महिला 70 मीटर उंच डोंगरावून खाली पडली. महिलेला अनेक गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik