1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. A young man died and two others were seriously injured in a horrific accident in bihar

भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रिसिप पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, तर दोन तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले. तसेच डोमुहान पुलाजवळ ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. 

तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या भीषण अपघात एक तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर इतर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
नवी मुंबईत व्यावसायिकाची 15 लाखांना फसवणूक, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल