बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (09:55 IST)

काँग्रेस खासदार आणि जेडीयूच्या आमदाराला जीवे मारण्याच्या धमक्या

congress
बिहारमध्ये एका खासदार आणि आमदाराला धमक्या आल्या आहे. तसेच किशनगंजचे खासदार डॉ जावेद आणि सीतामढी येथील जेडीयू आमदाराला ही धमकी देण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एका खासदार आणि आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून किशनगंज लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार डॉ मोहम्मद जावेद आझाद यांना धमकी देण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली आहे. 

तर सीतामढीमध्ये रननिसैदपूरमधील जेडीयूचे आमदार पंकज कुमार मिश्रा आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मनीष कुमार यांना धमकी देण्यात आली आहे. तसेच आमदाराकडून खंडणीची मागणी देखील करण्यात आली.
 
Edited By- Dhanashri Naik