गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (12:08 IST)

स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवासी जखमी

बिहारच्या समस्तीपूरमध्ये स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री समस्तीपूर स्थानकाच्या बाह्य सिग्नलवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक्स्प्रेसच्या अनेक डब्यांच्या काचा फुट्ल्या. स्लिपरकोचवर दगडफेक केली त्यात अनेक प्रवासी जखमी झाले आहे.जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ट्रेन 45 मिनिटे उशिरा मुजफ्फरपूर स्थानकावर पोहोचली. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मुजफ्फरपूर- समस्तीपूर रेल्वे स्थानकावर जयनगरहून नवी दिल्ली जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली असून या मध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहे. या दगडफेकीमुळे प्रवासी घाबरले.

समस्तीपूर स्थानकाच्या बाह्य सिग्नलवर ट्रेन पोहोचली आणि काही अज्ञातांनी दगडफेक करण्यास सुरु केले. दगडफेकीमुळे अनेक डब्याच्या काचा फुटल्या आहे. आरपीएफ समस्तीपूरने अज्ञाताच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. 
Edited by - Priya Dixit