गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (13:21 IST)

बसने उभ्या असलेल्या ट्रकला दिली धडक, 3 प्रवासी ठार, 15 जखमी

बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील चेनारी पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रवासी बस एका पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील चेनारी पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रवासी बस एका पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हे सर्व लोक राजस्थानहून गया येथे पिंड दान देण्यासाठी येत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात राहणारे अनेक लोक प्रवासी बसमध्ये पिंड दान करण्यासाठी गया येथे जात होते. यावेळस चेनारी पोलीस स्टेशन परिसरातील साबराबादजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच हे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतक एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जखमींमध्ये अनेक महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik