मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (08:01 IST)

महाराष्ट्रातील बिल्डरचा मृतदेह आढळला मध्यप्रदेशच्या जंगलात

death
मध्य प्रदेश मधील खरगोन जिल्ह्यातील जंगलामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे.  हा मृतदेह महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एका बिल्डरचा सांगण्यात येत आहे. जे गेल्या 22 दिवसांपासून बेपत्ता होते. तसेच हा मृतदेह बुधवारी भीकनगावच्या सीमेवर दोडवा गावाच्या जंगलात आढळला आहे.  महाराष्ट्र पोलीस गेल्या काही दिवसांपासून बिल्डरच्या शोधात होते व आता त्या बिल्डरचा मृतदेह मिळाला आहे असे सांगण्यात येत आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील औरंगाबाद मधील बेपत्ता असलेली बिल्डरचा मृतदेह बुधवारी सनावद व भीकनगांव सीमेवर दोडवा जवळील जंगलात आढळला आहे. तसेच मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने पहिले हत्या करून मग नंतर मृतदेह जाळला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत असून  पोलीस अधिकारींनी सांगितले की बिल्डर  बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आली होती तसेच महाराष्ट्र पोलिसांनी सनावादपोलीस स्टेशनशी संपर्क केला होता.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिल्डर यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन देशगांव मध्ये मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस शोधात तिथपर्यंत पोहचले व बुधवारी बिल्डर यांचा मृतदेह जंगलात आढळला महाराष्ट्र पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार बिल्डर औरंगाबाद वरून मुंबई करीत निघाले होते. तसेच यानंतर भुसावळ वरून ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघाले पण ते यादरम्यान देशगांव मधून बेपत्ता झाले असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.