बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (11:54 IST)

2026 पर्यंत संपूर्ण देशातून नक्षलवाद संपुष्टात येणार, महाराष्ट्रात पुढे असेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eaknath shinde
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली अतिवादग्रस्त राज्यातील सुरक्षा आणिविकासाचा आढवा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवादावर वक्तव्य दिले आहे.  तसेच यातून त्यांनी विरोधकांना देखील उत्तर दिले आहे. ते म्हणाले, बैठक व्यवस्थित झाली. 2026  पर्यंत देशातून नक्षलवादाचा नायनाट करायचा आहे. जेणे करून देशाचा विकास होईल. या मोहिमेत महाराष्ट्र पुढे असेल. महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरच संपवायचे आहे. 

महाराष्ट्रात आधी 550 नक्षलवादी संघ होते आता 55-56 संघ शिल्लक आहे. आमच्यासाठी हे मोठे यश आहे या भागात आम्ही विकास केला आहे. या ठिकाणी रस्ते बांधले गेले असून शिक्षण सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहे. या ठिकाणी रोजगार आणि उद्यो देखील आहे. नक्षलींत वाढ होत नाही.पोलीस त्यांच्यावर लक्ष देत आहे. सर्व सामान्य नागरिकांचे जीव वाचवणे आणि त्यांच्या संपत्तीची रक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. सुरक्षितता आणि विकास दोन्हीकडे लक्ष देत आहो.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, राज्यात माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेला विरोधकांचा पहिल्या दिवसापासून विरोध होत आहे. विरोधकांनी ही योजना निवडणुकी पर्यंत आहे आणि योजना चांगली नाही असे म्हटले.

मी त्यांना आव्हान देतो की , त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले हे सांगावे. ही योजना महिलांसाठी आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. आश्वासन देत नाही.जनतेचा आशीर्वाद मिळाला तर महायुती राज्यात  पुन्हा बहुमताने आपले सरकार बनवणार. 
Edited By - Priya Dixit