रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (13:35 IST)

महाराष्ट्र : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक

arrest
मुंबई: महाराष्ट्रातील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यांमधून पोलिसांनी लैंगिक लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने मुरकुटे यांचावर 2019 पासून अनेक वेळेस लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे.
 
मिळालेल्या माहितनुसार माजी आमदार मुरकुटे हे मुंबईहून अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या घरी परतत असताना या प्रकरणी राहुरी पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. तसेच पोलिसांनी सांगितले की, एका महिलेने गेल्या सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती की, माजी आमदारांनी 2019 पासून अनेकदा तिचा लैंगिक छळ केला.
 
तसेच या तक्रारीच्या आधारे अहिल्यानगर येथील राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी मुरकुटे यांना पहाटे अहिल्यानगर येथील श्रीरामपूर येथील त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतले आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुरकुटे यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
ज्येष्ठ राजकारणी माजी आमदार भानुदास मुरकुटे हे यापूर्वी काँग्रेस आणि जनता दलाशी संबंधित होते. तसेच मुरकुटे यांनी विधानसभेत तीन वेळा श्रीरामपूरचे प्रतिनिधीत्व केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय दिसत आहे. अशोका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील ते आहे. अलीकडेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रवास केल्यानंतर त्यांनी भारत राष्ट्र समिती राष्ट्रीय समिती पक्षात प्रवेश केला होता.

Edited By- Dhanashri Naik