1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. A young man died of a heart attack while walking

चालता चालता तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

अलीकडे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेक जणांना चालताना, नाचताना, बोलताना हृदय विकाराचा झटक्यानं जीव गमवावा लागत आहे.सध्या सोशल मीडियावर असे हे व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती घरातून ऑफिससाठी जाताना दिसत आहे. त्याचा हातात एक पिशवी दिसत आहे. त्यानंतर तो लिफ्टचं बटण दाबतो आणि लिफ्टची वाट बघत असताना त्याला अचानक त्रास होऊ लागतो तो बॅग खाली ठेवतो आणि हवाखान्यासाठी बिल्डिंगच्या खिडकीतून बाहेर बघतो आणि अचानकपणे खाली कोसळतो.आणि त्याचा मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
 
 Edited By - Priya Dixit 
 
 
पुढील लेख
Pakistan : इम्रान खान ला अटक करण्यासाठी पोलिस लाहोर पोहोचली