सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (17:02 IST)

महिलेने दिला चार मुलांना जन्म सर्वांचा मृत्यू

baby legs
युपीच्या शाहजहांपूर येथे एका महिलेने मेडिकल कॉलेजच्या महिला रुग्णालयात 4 बाळांना जन्म दिला या बाळांपैकीं तीन मुलींचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला तर मुलाचा जन्मानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार मुलांच्या जन्माचा आनंद हा क्षणार्धातच राहिला. जन्मानंतर चारही बाळांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना निराशा झाली.शिवानी असे या महिलेचे नाव आहे. शिवानीला प्रसूती वेदनेमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री तिने एकामागून एक चार मुलांना जन्म दिला त्यापैकी तीन मुली होत्या त्यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. तर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर महिला निरोगी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु  आहे.   
 
Edited By - Priya Dixit