गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:24 IST)

'आधार'च्या गोपनीयतेची दिली बातमी, झाला गुन्हा दाखल

aadhar card
आधार प्राधिकरण म्हणजे UIDAI ने ‘दी ट्रिब्यून’ हे वृत्तपत्र आणि त्यांच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे घेऊन आधार कार्डचा डेटा विकला जात असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. त्याची गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आफआयआरमध्ये रिपोर्टर रचना खैरा आणि त्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला त्यांचंही नाव आहे. दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी  एफआयआर दाखल झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

केवळ 500 रुपये मोजल्यास कोणाच्याही आधार क्रमांकावरील गोपनीय माहिती मिळते, असं वृत्त रचना यांनी दिलं होतं. त्याचबरोबर अधिकचे 300 रुपये दिल्यास आधार कार्ड प्रिंटिंगचे सॉफ्टवेअरही मिळतात, असं या बातमीत म्हटलं होतं. या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. त्यानंतर आधार प्राधिकरणाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर यासंदर्भातील बातमीप्रकरणी रचना खैरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.