प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तृतीयपंथी व्यक्तींनाही आपल्या ट्रान्सजेंडर आधार कार्डद्वारे कर विवरणपत्र भरता येणार आहे. यापूर्वी वेबसाईट अनेक तृतीयपंथ्यांचे आधार कार्ड स्विकारत नव्हती त्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१७-१८चे कर विवरणपत्र भरण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या आपले कर विवरण भरण्यासाठी अनेक जण रांगेत असल्याने वेबसाईटला अनेक अडचणींचा समावेश करावा लागत आहे. आजवर काही तृतियपंथीयांचे कर विवरणपत्र भरताना तृतीयपंथ्यांना अनेक अडचणी येत होत्या.