शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 16 मे 2018 (08:10 IST)

पेन्शनसाठी आधार कार्ड सक्तीचे नाही

सरकारी निवृत्तीवेतन धारकांना आपली पेन्शन घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलेले नाही असे कार्मिक विभागाचे मंत्री जितेंद्रसिंह यांनी म्हटले आहे. आज येथे एका बैठकीत बोलताना ते म्हणाले की आधार कार्ड ही अतिरीक्त सुविधा आहे पेन्शन धारकांना लाईफ सर्टिफिकेट ऐवजी हे कार्ड वापरण्याची अनुमती देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
 
आपले बॅंक खाते आधारला लिंक न केल्याने आम्हाला पेन्शन मिळवण्यास अडचण येत असल्याची तक्रार काहीं निवृत्तीवेतनधारकांनी मंत्र्यांकडे केली होती. त्यावर मंत्र्यांनी केलेल्या या खुलाशामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आधार कार्ड नाही म्हणून कोणालाही पेन्शन मिळण्यापासून वंचित ठेवले जाणार नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारचे सध्या एकूण 61 लाख 17 हजार निवृत्तीवेतनधारक आहेत.