बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2024 (16:00 IST)

Accident: 23 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदामध्ये पडला, 10 ठार

accident
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातून एका मोठ्या अपघाताची बातमी आली आहे. येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत पडला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सात गंभीर जखमींना पाच हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून ऋषिकेश एम्समध्ये आणण्यात आले आहे. तर सात  जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला. 
 
दिल्ली नोएडाहून  चोपटा तुंगनाथकडे  निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 23 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर पुढे बद्रीनाथ महामार्गावरील रायतोलीजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडला.नदीच्या जोरदार प्रवाहात वाहनांमधील सर्व लोक वाहून गेले.आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर काही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि इतर पथक घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. येथे रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या तीन जणांनी स्वत:ला वाचवण्यासाठी उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. 
 
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त करताना सांगितले की, टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 
 
दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे झालेल्या रस्ते अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी X वर पोस्ट शेअर केली आणि म्हटले की या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Edited by - Priya Dixit