गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (09:39 IST)

'या' तारखेनंतर देशात शाळा, महाविद्यालये सुरू होतील

येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर देशातील शाळा, महाविद्यालये सुरू होतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. 
 
दरम्यान, आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशातील शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू करण्यात येतील.