शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (14:56 IST)

दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून होणार सुटका, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे बंधनकारक

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. 31मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत. दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली. आता फक्त सामाजिक अंतर राखावे लागणार असून मास्क चा वापर करणे बंधनकारक आहे. 
 
केंद्र सरकारने  24 मार्च 2020 रोजी प्रथमच कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानंतर अनेक वेळा या मार्गदर्शक तत्त्वात बदल केंद्र आले.
 
केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशवासियांना अँटी-कोविड लसींचे 181.56 कोटी डोस देण्यात आले आहेत,
 
विद्यमान आदेशाची मुदत 31 मार्च रोजी संपल्यानंतर गृह मंत्रालयाकडून कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत. तथापि, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेस मास्क आणि हात धुण्यासह सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे.