शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (15:05 IST)

सहा वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा आणि चुलत मामा यांच्या कडून 'तिच्यावर ' अत्याचार

पुण्यातील ११ वर्षीय मुलीला मागील सहा वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा आणि चुलत मामा यांच्या अत्याचार केले  आहेत. याबाबत तिने स्वत: सांगितले आहे. या मुलीवर वडील आणि भावाने बलात्कार केला असून आजोबा आणि चुलत मामाकडून विनयभंग झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयमध्ये ‘गुड टच अ‍ॅण्ड बॅड टच’ बद्दल मुलींना माहिती दिली जाते. दरम्यान पुण्यातील एका भागाती शाळेत देखील हे व्याख्यान झाले, यावेळी एका ११ वर्षीय मुलीने उपस्थित समुपदेशक आणि शिक्षकांना मागील सहा वर्षांपासून विविध ठिकाणी तिच्यावर वडील, भाऊ यांच्याकडून बलात्कार करण्यात आल्याचे आणि आजोबा आणि चुलत मामाकडून विनयभंग झाल्याचे सांगितले. 
 
हे सर्वजण तिला भीती दाखवून अत्याचार करीत असल्याचे पीडित मुलीने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पीडितेच्या भावाला अटक करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.