भागलपूर आणि खगरिया यांना जोडणारा अगुआनी पूल 2 वर्षांत 3 वेळा कोसळला
बिहारच्या भागलपूर आणि खगरिया यांना जोडणारा अगुआनी पूल पाण्यात कोसळला आहे. शनिवारी सकाळी गेल्या वर्षी कोसळलेल्या अगुआनी पुलाच्या बांधकामाधीन असलेल्या सुपर स्ट्रक्चरचा उर्वरित भाग गंगानदीत कोसळला. हा पूल आतापर्यंत तीन वेळा कोसळला आहे.
सर्वप्रथम सुपर स्ट्रक्चर 2022 मध्ये 5 नंबरचा खांब पडला. नंतर 2023 मध्ये तीन खांब कोसळले. आता एक खांब कोसळला आहे. पुलाचे बांधकाम 11 वर्षात पूर्ण झाले नाही.त्याची किमत सुमारे 1710 कोटी रुपये आहे. पूल बांधकाम महामंडळाचे म्हणणे आहे की, आधीच तुटलेला पुलाचा भाग काढताना तोच कोसळला आहे. पुलाचे नवीन भाग किंवा बांधकामाधीन असलेले भाग कोसळले नाही.
पुलाची पायाभरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी 2014 रोजी खगरिया जिल्ह्यातील परबट्टा येथे करण्यात आली होती. तसेच 9 मार्च 2015 रोजी काम सुरू करण्यात आले. अशा स्थितीत तब्बल 11 वर्षे उलटूनही हा पूल बांधण्यात आलेला नाही. हा पूल सुमारे 3.160 किमी लांबीचा बांधला जात आहे. यामध्ये खगरिया बाजूपासून सुमारे 16 किमी लांबीचा आणि सुलतानगंज बाजूकडून सुमारे चार किमी लांबीचा रस्ता तयार केला जात आहे
Edited by - Priya Dixit