शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (10:18 IST)

ऑगस्टपासून एअर इंडियाची वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा

एअर इंडियाची ऑगस्टपासून वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी  केली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी कोलंबोत आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा केली आहे.तप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा गेल्या दोन वर्षांतील दुसरा दौरा आहे. कोलंबो येथील बंदरनायके मेमोरिअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसमुदायाला संबोधित केले.