1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जून 2025 (21:12 IST)

Ahmedabad Air India plane crash नंतर एअर इंडियाच्या अनेक उड्डाणे रद्द, विमान कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कामकाजावर परिणाम

मंगळवारी एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर एअरलाइनच्या आंतरराष्ट्रीय कामकाजावर परिणाम झाला आहे. तांत्रिक तपासणीमुळे मंगळवारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. प्रवाशांना हॉटेल, रिफंड आणि रीशेड्युलिंगची सुविधा देण्यात आली आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी तांत्रिक आणि ऑपरेशनल कारणांमुळे सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली तेव्हा एअर इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. डीजीसीएने ड्रीमलायनर ताफ्याची अतिरिक्त चौकशी करण्याचे आदेश दिल्याने सहा उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याच वेळी, विमान उपलब्ध नसल्यामुळे अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान रद्द करण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik