शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (11:20 IST)

गुरु ग्रंथ साहिब अपान प्रकरण, सगळे आरोप बिनबुडाचे : अक्षय

तीन वर्षांपूर्वी गुरु ग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारसह पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल या तिघांना समन्स पाठवले आहेत. पंजाबच्या फरीदकोटमधील बरगाडी येथील हे प्रकरण आहे. मात्र, या प्रकरणी आरोप करणार्‍यांना आव्हान देत अभिनेता अक्षय कुमारने आपल्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदाच सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले. मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात एकदाही गुरुमीत राम रहिम या माणसाला भेटलेलो नाही. 
 
मी सोशल मीडियावर काही पोस्ट वाचल्या ज्यावरून मला हे समजले की गुरुमीत राम रहीम सिंह जुहू भागात राहतो पण माझी आणि त्या व्यक्तीची कधीही भेट झालेली नाही.