1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (18:11 IST)

मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावे बदलणार - प्रज्ञा ठाकूर

All unholy names of Muslim rulers will change - Pragya Thakur
भोपाळमध्ये अनेक ठिकाणांची नामांतरं केली जात आहे. या मोहिमेला भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पाठिंबा दिला आहे. मुस्लीम प्रशासकांच्या काळातील घटनांवरुन वेगवेगळ्या ठिकाणांना देण्यात आलेली नावं ही अपवित्र असून ती बदलण्याची गरज असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
 
ही नावं म्हणजे अत्याचार करणाऱ्या मुस्लीम शासकांच्या दहशतीची प्रतीकं आहेत. त्यामुळे ही नावं बदलण्यात यावीत. रक्तरंजित इतिहास असणाऱ्या सर्व ठिकाणांची नावं आम्ही भोपाळमधून पुसून टाकणार आहोत.
 
सध्याच्या नावांऐवजी या ठिकाणांना क्रांतीकारकांची नावं देण्यात यावीत अशी मागणी प्रज्ञा यांनी केली आहे.