मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:05 IST)

भाजपचे ‘मिशन 350 प्लस’

आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची  तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजपनं ‘मिशन 350 प्लस’ निश्चित केलं आहे.
 

देशातील 150 अशा जागा आहेत, जिथे भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असं अमित शाह यांनी बैठकीत सांगितलं. या जागा निवडून आणण्यासाठी त्यावर पुढील दोन वर्षे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांविषयी मंत्र्यांकडून माहिती मागवली. अमित शाह यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या 9 केंद्रीय मंत्री आणि 30 पक्ष पदाधिकाऱ्यांना आतापासूनच कामाला लागण्यास सांगितले आहे. यावेळी अमित शाह यांनी 10 मिनिटांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही सादर केलं. यामध्ये बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांचा विशेष उल्लेख केला गेला आहे.