शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (15:01 IST)

कुछ दिन तो गुजारो उत्तराखंड में... अमिताभ बच्चन गुजरातच्याप्रमाणे पर्यटन वाढविण्यासाठी शो करतील

'कुछ दिन तो गुजारो गुजरात में’  या टॅगलाईनद्वारे गुजरातच्या पर्यटन विभागासाठी प्रचार करणारे अभिनेता अमिताभ बच्चन आता उत्तराखंडासाठीही असेच करणार आहेत. उत्तराखंड पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच ते  रिअल्टी शो होस्ट करणशर आहे.  शुक्रवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक असेल, 'स्वर्ग में 100 दिन'. रिअल्टी शो अमिताभ बच्चन होस्ट करतील आणि सर्व बातम्या आणि करमणूक चॅनल्सवर प्रसारित होतील. ही माहिती उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते मदन कौशिक यांनी दिली आहे. 
 
ते म्हणाले की हा कार्यक्रम उत्तराखंडामधील पर्यटनाच्या विकासासाठी चालविला जाईल. हे काही प्रमाणात गुजरातप्रमाणेच असेल, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला होता. एवढेच नव्हे तर एका कंपनीला राज्य सरकारकडूनही जबाबदारी देण्यात आली आहे. मदन कौशिक म्हणाले की, मेसर्स जंपिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडला हा शो तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 12.81 कोटी रुपये दिले आहेत. कोरोना कॉलर ट्यूनमध्येही अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरण्यात आला. या कॉलर ट्यूनचा उद्देश लोकांना कोरोना संसर्गाची जाणीव करून देणे हा होता. 
 
मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांच्या जागी जसलीन भाल्लाचा आवाज वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कोरोनासंदर्भातील संदेशातही बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृतीचा संदेश देण्यात येत होता, परंतु आता कोरोना लसीकरणाची माहिती दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे की अमिताभ बच्चनाची जागा घेणारी जसलीन भाल्ला ही एक प्रसिद्ध व्हॉईसओव्हर कलाकार आहे. तिचा आवाज मेट्रोसह स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांनी वापरला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ती व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.