सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (10:21 IST)

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना वाढीव मोबदला मिळणार

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना २००० आणि ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने  शासन निर्णय निर्गमित केला आहे.
 
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २०००  व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७.५६ कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे.