रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (12:14 IST)

घशात चॉकलेट अडकल्याने ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

चॉकलेट सर्वांनाच आवडते. चवीने गोड असणारी चॉकलेट कोणाचा जीव घेऊ शकते हे धक्कादायक आहे. पण तेलंगणातील वारंगल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आठ वर्षांच्या मुलाचा चॉकलेट खाताना मृत्यू झाला. हे चॉकलेट त्याच्या वडिलांनी परदेशातून आणल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची केवळ तेलंगणातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा आहे. आठ वर्षांचा संदीप सिंग चॉकलेट खात होता. दरम्यान त्याच्या घशात चॉकलेटचा तुकडा अडकला. यामुळे संदीप तडफडू लागला. खूप प्रयत्न करूनही चॉकलेटचा तुकडा ना घशात उतरला ना तोंडातून बाहेर पडला. मुलाची ढासळलेली प्रकृती पाहून कुटुंबीयांनी घाईघाईने त्याला एमजीएम रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Edited By- Priya Dixit