शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (17:05 IST)

Kanpur Zoo Accident: कानपूर प्राणिसंग्रहालयातील अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कानपूर प्राणीसंग्रहालयात झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती पती आणि मुलांसह येथे भेटायला आली होती आणि ड्रायव्हरने ट्रेन सुरू केल्यावर ती ट्रेनमध्ये चढणार होती.यामुळे महिला रुळावर पडून गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
 कानपूरमधील चकेरी येथे राहणारा सुबोध शर्मा पत्नी अंजू शर्मा आणि दोन मुलांसह प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. ट्रेनमध्ये बसण्यासाठी त्या चढत असताना त्याच  एक हृदयद्रावक अपघात झाला, ज्यामध्ये ट्रेनमधून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
महिलेची मुलगी आदितीचा आरोप आहे, "ड्रायव्हरने ट्रेन सुरू केली तेव्हा आई ट्रेनमध्ये चढणार होती त्यामुळे आईचा ताबा सुटला आणि ती खाली पडली. अनेक वेळा आरडा ओरड करूनही ड्रायव्हरने ट्रेन थांबवली नाही. माझ्या डोळ्यासमोर ट्रेन माझ्या आईवरून गेली ". या घटनेबाबत अकमल खान एसीपी कर्नलगंज यांनी सांगितले की, महिला आपल्या कुटुंबासह फिरायला गेली होती. त्याचवेळी ट्रेनमधून पडून गंभीर जखमी झाल्या.  त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून महिलेचे मृतदेह कुटुंबियांना देण्यात येणार आहे. 
 
Edited By - Priya DIxit