1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 एप्रिल 2025 (16:43 IST)

आईस्क्रीम कारखान्यातील कामगारांना चोरीच्या संशयावरून मालकाने दिली भयंकर शिक्षा

Chhattisgarh News: छत्तीसगड मधील कोरबा जिल्ह्यात धक्कदायक बातमी समोर आली आहे. आईस्क्रीम कारखान्याच्या मालकाला दोन्ही कामगारांवर चोरीचा संशय होता. या कारणास्तव त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली. कपडे काढून त्यांना विजेचा झटका देण्यात आला आणि त्याचे नखे उपटण्यात आले.
मिळालेल्या माहितनुसार छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका मालकाने त्याच्या दोन कामगारांचे नखे उपटले आणि त्यांना विजेचा धक्का देऊन  शिक्षा दिली. मालकाला या कामगारांवर चोरीचा संशय होता आणि त्यासाठीच त्यांना शिक्षा देण्यात आली. शनिवारी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरात घडली. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील दोन कामगार हे आईस्क्रीम कारखान्यात काम करायचे. मालकाने दोन्ही कामगारांवर चोरीचा आरोप केला आणि त्यांचे कपडे काढले. यानंतर, दोघांनाही विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अर्धनग्न पुरूषाला विजेचे झटके देताना आणि मारहाण करताना दिसत आहे. घटनेनंतर, दोन्ही पीडित पळून गेले आणि भिलवाडा येथे पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.  
 
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी कोरबा येथील सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात मालकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.