शनिवार, 15 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (09:27 IST)

छत्तीसगडहून महाकुंभाला लोकांना घेऊन जाणाऱ्या बोलेरोला भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू तर १९ जखमी

Chhattisgarh News: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बोलेरोला अपघात झाला. बोलेरो आणि बसच्या धडकेत १० भाविकांचा मृत्यू झाला. तर १९ भाविक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात दहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला. भाविकांनी भरलेली बोलेरो आणि बसमध्ये समोरासमोर टक्कर झाली आहे. या अपघातात बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व जण छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते.
या अपघातात, संगममध्ये स्नान करून वाराणसीला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करणारे १९ भाविकही जखमी झाले. सर्व जखमींना सीएचसी रामनगर येथे दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवास करणारे सर्व भाविक मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
Edited By- Dhanashri Naik