1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (12:54 IST)

अजित डोवाल्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला,पोलिसांनी ताब्यात घेतले

An unidentified person tried to break into Ajit Dovalya's house
दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, सुरक्षा दलांनी त्या व्यक्तीला थांबवले आणि ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एक अज्ञात व्यक्ती एनएसए अजित डोवाल यांच्या घरात वाहन घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले आणि आता स्थानिक पोलीस आणि विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहेत. तो भाड्याची गाडी घेऊन आला होता, प्राथमिक तपासात तो काहीसा मानसिक त्रास असल्याचे समजते.
 
तो चुकून घरात घुसला की त्यामागे काही षडयंत्र आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे