1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (10:54 IST)

सेल्फीने घेतला 4 मित्रांचा बळी, रेल्वेची धडक लागून ठार झाले

Selfie took the lives of 4 friends
सेल्फी च्या नादात अनेकांनी जीव गमावल्याच्या बातम्या ऐकू येतातच. तरी ही तरुण वर्ग सेल्फी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतात. आणि काही तर जीव गमावून बसतात. असेच काही घडले आहे. चार मित्रांच्या बाबतीत. त्यांना सेल्फीमुळे आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी संध्याकाळी सेल्फी घेण्याच्या नादात चार तरुणांना रेल्वेने धडक दिल्याने त्यांच्या दुर्देवी अंत झाल्याची घटना गुरुग्राम येथे घडली आहे. बसई धनकोट रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी दाखल झालेले जीआरपी पोलीस मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सराय रोहिल्लाहून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गुरुग्राम रेल्वे स्थानकातून दुपारी 4:48 वाजता निघाली होती. बसई धनकोट रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन पोहोचली. रेल्वे रुळावर सेल्फी घेत असलेले 4 तरुण सेल्फी घेण्याच्या नादात लागले होते की, त्यांना रेल्वे आल्याचे कळले नाही आणि ते त्याच्या कचाट्यात सापडले. या अपघातात चोघांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या तरुणाचे विखुरलेले अवयव 500 मीटर पर्यंत पसरले होते. हे तरुण अॅक्टिव्हा वर आले होते. 
 
अपघाताची माहिती मिळतातच जीआरपी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि ते अॅक्टिव्हा स्कूटरचा नंबर आणि त्यांच्या मोबाईल फोनच्या आधारे चौघांची  ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहे.