Youtube वर रेसिपी दाखवणारी 107 वयाची आजी मस्तानम्मा यांचे निधन
आपल्या Youtube चॅनल Country Foods वर स्वादिष्ट रेसिपी सांगणारी 107 वयाची म्हातारी मस्तानम्मा यांचे निधन झाले. आजी शेतात अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा रेसिपी दाखवायची. आजीच्या चॅनलला 12 लाखाहून अधिक लोकांनी सब्सक्राइब केलेले होते.
निरक्षर मस्तानम्मा यांनी शंभर वर्षाच्या वयानंतर यूट्यूबवर आपली कला दाखवून सिद्ध केले होते की इच्छा शक्ती असली तर काहीही करणे अशक्य नाही. ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी आपल्या नातवाच्या मित्रांसाठी वांग्याची भाजी बनवली होती.
सर्वांनी ती खूप आवडली आणि नातवाने ती यूट्यूबवर अपलोड केली. रात्रभरात लाखो लोकांना हा व्हिडिओ बघितला.
आंध्रप्रदेशाच्या गुंटूर जिल्ह्याच्या गुडीवारा गावात राहणारी मस्तानम्मा यांचे जीवन संघर्षात गेले. वयाच्या 11 व्या वर्षी लग्न झाला आणि 10 वर्षाच्या आत पतीचे निधन झाले. पाच मुलांच्या आईने खूप संघर्ष केला परंतू चार मुलांचेही निधन झाले.
मस्तानम्मा यांची विशेषता होती की जेवण तयार करताना त्या आपल्या जीवनातील अनेक किस्से सांगायची.