1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 सप्टेंबर 2017 (16:57 IST)

सरकारी खाजगी, संस्थांमध्ये स्तनपान खोलीची व्यवस्था करा

angoorlata-deka-demands-for-special-room-to-babies-in-vidhansabha

आसामच्या आमदार अंगूरलता डेका यांनी विधानसभेत स्तनपान खोलीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अशाप्रकारच्या खोलीची व्यवस्था करावी अशी मागणीही अंगूरलता यांनी केली आहे. 

ऑगस्ट ३ रोजी त्यांनी एका मुलीला जन्म दिला. यानंतर जेव्हा त्यांनी विधानसभेत हजेरी लावली तेव्हा त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. ‘दरतासाला मला मुलीला स्तनपान करण्यासाठी घरी जावे लागते, यामुळे मला कामकाजात लक्ष देता येत नाही’ असे अंगूरलता यांनी एका मुलाखतीत सांगितले. 

अंगूरलता एकेकाळी आसामच्या मनोरंज क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व होते. २०१५ मध्ये भाजपच्या तिकीटावर बतद्रोवा मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून आल्या. त्यानंतर अंगूरलता यांनी प्रसिद्ध अभिनेता आकाशदीपसोबत लग्न केले आहे.