1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (20:56 IST)

उत्तराखंडमध्ये प्रचंड हिमस्खलन, ५७ लोक बर्फात अडकले

Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीदरम्यान, आज मानाजवळ झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे खळबळ उडाली आहे. या हिमस्खलनात सुमारे ५७ लोक गाडले गेले होते, त्यापैकी १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित लोक अजूनही बर्फात गाडले गेले आहे. बचावकार्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये आज एक मोठी घटना समोर आली आहे. उंचावरील भागात बर्फवृष्टी होत असताना, आज चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमाभागाजवळील माना कॅम्पजवळ एक मोठा हिमस्खलन झाला. हिमस्खलनात सुमारे ५७ कामगार गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. ते लोक तिथे बांधकामाच्या कामात व्यस्त होते. हिमस्खलनाच्या बातमीने संपूर्ण राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.  तसेच त्यापैकी तिघांना आयटीबीपी आणि लष्कराच्या मदतीने लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. इतरांचा शोध सुरू आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे दळणवळण सेवा ठप्प झाल्याचे बोलले जात आहे.