केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला मैदानावर भव्य जनसागर

नवी दिल्ली| Last Modified रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (09:27 IST)
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज (16 फेब्रुवारी) सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची

शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी होत आहे (Kejriwal Oath Taking Ceremony). या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदान आणि परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केजरीवालांचा शपथविधी सोहळा सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुरु होणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली (Kejriwal Oath Taking Ceremony).

केजरीवालांच्या शपथविधी
सोहळ्यासाठी दिल्ली पोलीस, सीआरपीएफसह निमलष्करी दलातील 2,000 ते 3,000 जवान तैनात असतील. या दरम्यान ड्रोनच्या मदतीने सर्व कार्यक्रमावर नजर ठेवली जाईल, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली
केजरीवालांसोबत व्यासपीठावर कोण?

दिल्लीच्या जडणघडणीत हातभार लावणारे विविध क्षेत्रातील 50 जण केजरीवाल यांच्यासोबत मंचावर असतील. यामध्ये शिक्षक, बस मार्शल, सिग्नेचर ब्रिजचे आर्किटेक्ट आणि शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती आपचे नेता मनिष सिसोदिया यांनी दिली.

मोदींनाही निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आपने आधीच सांगितले होते की, मुख्यमंत्री किंवा इतर राज्यातील राजकीय नेते या कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत. कारण हा ‘दिल्लीकेंद्रित’ कार्यक्रम असेल.
‘छोट्या मफलरमॅन’लाही निमंत्रण

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ग्रहण सोहळ्यात दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावेळी आपच्या कार्यायल परिसरात आपल्या वडिलांसोबत केजरीवालांच्या गेटअपमध्ये एक छोटा मफरमॅन पोहोचला होता. या छोट्या केजरीवाल म्हणजेच एक वर्षाच्या अव्यान तोमरलाही या सोहळ्याचं खास निमंत्रण आहे.

शपथवुधी सोहळ्याला एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता
शपथविधी सोहळ्यासाठी रविवारी रामलीला मैदानावर तब्बल एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असा दावा आपकडून करण्यात आला आहे. “सुमारे एक लाख लोक या सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिक गेट क्रमांक 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या सहा प्रवेशद्वारातून रामलीला मैदानात प्रवेश करु शकतील”, असं त्यांनी सांगितलं.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

आरोपपत्रात खुलासा - दाऊदची बहीण आणि मलिक यांच्यात अनेक ...

आरोपपत्रात खुलासा - दाऊदची बहीण आणि मलिक यांच्यात अनेक भेटी, हिसकावली कोटींची मालमत्ता
अंडरवर्ल्ड डॉन 'दाऊद' इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी ...

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोविडनंतर आता जगाला मंकीपॉक्स व्हायरसचा धोका आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इशारा ...

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले
बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

हवेतच विमानाचे इंजिन बंद

हवेतच विमानाचे इंजिन बंद
शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ...

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा
हैदराबादमध्ये 2019 मध्ये, एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या 4 आरोपींना ...