शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (15:47 IST)

आर्यन खान परदेशात ड्रग नेटवर्कशी जुळलेला आहे, तपासासाठी पुरेसा वेळ हवा: एनसीबी

आर्यन खानवर एनसीबीने आरोप केला आहे की तो परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता जे बेकायदेशीर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचे दिसते आणि तपास चालू आहे. जामीन मिळाल्यास तो देश सोडून जाऊ शकतो या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असेही एनसीबीने म्हटले आहे.
 
एनसीबीने म्हटले आहे की आरोपी हा समाजातील एक प्रभावशाली व्यक्ती आहे, ज्यामुळे तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो किंवा ज्या साक्षीदारांना तो वैयक्तिकरित्या ओळखतो त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच वेळी, जामीन मिळाल्यावर तो देश सोडून पळून जाऊ शकतो या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
 
आर्यनचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले
आर्यन त्याचा मित्र मर्चंट सोबत क्रूझवर गेला होता. तो चेक-इन करत असताना त्याला एनसीबीने अडवले. आर्यनच्या ताब्यातून कोणतीही जप्ती झाली नाही. जामिनासाठी हे पुरेसे आहे.
 
ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून बरेच प्रयत्न करत आहेत, परंतु प्रत्येक वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नवनव्या गोष्टी समोर आणून आर्यनला तुरुंगातून बाहेर पडू देत नाहीए.