मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (11:05 IST)

पंतप्रधान मोदी आज देणार गती शक्ती योजनेची भेट, जाणून घ्या यात काय खास आहे

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना गति शक्ती योजनेची भेट देणार आहेत. 100 लाख कोटी रुपयांच्या या योजनेमुळे देशात रोजगाराच्या संधी वाढतील आणि पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होईल.
 
75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 8 व्यांदा राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.
पायाभूत योजनांना चालना देण्यासाठी आणि उत्पादन उद्योगाला बळ देण्यासाठी सरकार शंभर लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री गती शक्ती योजना सुरू करेल असे ते म्हणाले होते. या योजनेद्वारे मूलभूत क्षेत्राला बळकटी दिली जाईल.
 
गतिशक्ती योजनेमुळे उत्पादन क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि यामुळे तरुणांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. या योजनेमुळे देशात उत्पादन उपक्रम वाढतील आणि निर्यात वाढेल. सरकार पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर भर देईल
 
ही योजना का सुरू होत आहे: भारत गती शक्ती योजनेअंतर्गत आपल्या सर्व मैन्युफैक्चरिंग  उत्पादनांना प्रोत्साहन देईल. यामुळे देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. या योजनेचा लाभ विशेषतः स्थानिक उत्पादकांना दिला जाईल. लघु, कुटीर उद्योगांनाही विशेष सहकार्य मिळेल. या योजनेमुळे MSME क्षेत्रात ही योजना वाढण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत 75 वंदे भारत गाड्या 75 आठवड्यांत देशाच्या कानाकोपऱ्यात जोडल्या जातील.