शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (17:11 IST)

81 वर्षीय आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, शिष्यावर आश्रमात केलं होतं दुष्कर्म

मंगळवारी 81 वर्षीय आसारामला सुरतमधील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले. यापूर्वी 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने आसारामला यूपीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो जोधपूर कारागृहात बंद आहे.
 
प्रकरण 22 वर्षे जुने आहे. 10 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आसारामवरील बलात्काराचा हा खटला 22 वर्षांचा आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2013 मध्ये अहमदाबादमधील चांदखेडा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआरनुसार 2001 ते 2006 दरम्यान अहमदाबाद शहराच्या बाहेरील एका आश्रमात महिलेवर अनेकदा बलात्कार झाला होता. ती महिला तेव्हा आसारामच्या आश्रमात होती. पोलिसांनी जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
 
या प्रकरणात आसारामच्या पत्नीसह अन्य 6 आरोपी होते. न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला होता. उर्वरित 5 आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आसारामला शिक्षा सुनावण्यात आली तसेच पीडितेला 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
पीडितेच्या लहान बहिणीने आसारामच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. दोन बहिणींपैकी धाकट्याने आसारामचा मुलगा नारायण साई आणि मोठ्या बहिणीने आसारामविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मोठ्या बहिणीच्या तक्रारीमुळे गांधीनगरमध्ये आसाराम यांच्यावर गांधीनगरमध्ये खटला चालवण्यात आला, ज्यामध्ये सोमवारी न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले.