मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (09:26 IST)

माजी उपमुख्यमंत्रीच्या ताफ्यावर हल्ला

Haryana News
हरियाणातील जिंद जिल्ह्यातील उचाना कलान विधानसभेत काल रात्री मोठी घटना घडली. उचाना कलान येथे रात्री उशिरा माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी ताफ्याच्या वाहनाला लक्ष्य केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दुष्यंत चौटाला जाहीर सभेला संबोधित करत असताना तरुणांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर अज्ञातांनी दुष्यंत यांच्या ताफ्यावर हल्ला केला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती घेतली. अज्ञातांनी वाहनावर विटा व दगडाने हल्ला करून वाहनाची मोडतोड केली.
 
जेजेपी आणि एएसपी रोड शोच्या माध्यमातून प्रचार करत होते. रोड शोमध्ये दुष्यंतसोबत चंद्रशेखर रावणही उपस्थित होते. या अचानक झालेल्या हल्ल्याने हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलीस प्रशासनही पुरेपूर काळजी घेत आहे.
 
Edited By- Dhanashri Naik