संबंधित माहिती
- उत्तर प्रदेशमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू!
- नोएडामध्ये शाळेत 6 वर्षीय मुलीचा विनयभंग
- यूपीमध्ये बदला घेण्यासाठी लांडगे हल्ला करत आहेत? तज्ज्ञांनी केली मोठी भीती व्यक्त
- गळफास लावून व्हिडिओ बनवून केली तरुणाने आत्महत्या, म्हणाला मित्रांनो लग्न करू नका!
- उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लांडग्यांची दहशत कायम, 5 वर्षीय मुलीवर हल्ला
बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये गेला काही दिवसांपासून लांडग्याच्या दहशतीमुळे लोक घाबरले आहे. तसेच पोलिसांसोबतच वनविभागाचे पथकही लांडग्यांच्या शोधात शोधमोहिमेत गुंतले आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे, तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहे. वनविभागाच्या अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार एक लांडगा अजून शिल्लक असून त्याचा शोध सुरू आहे.
तसेच लांडग्यांचे सततचे हल्ले पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर लांडग्यांना पकडण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासाठी प्रशासनाने लांडग्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली होती. एवढेच नाही तर ड्रोनच्या माध्यमातून लांडग्यांवरही नजर ठेवली जात होती.
याशिवाय मानवभक्षक लांडग्यांना पकडण्यासाठी या परिसरात पीएसीचे 200 जवान तैनात करण्यात आले होते. वनविभागाची सुमारे 25 पथकेही शोधकार्यात गुंतली होती. डीएफओ अजित प्रताप सिंह यांनी सांगितले की, लवकरच सहाव्या लांडग्याला पकडण्याचा प्रयत्न करू.