सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (19:07 IST)

Ayodhya : लग्न समारंभात नाचताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

death
काळ कधी आणि कुठे कोणावर झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. अली कडील काही दिवसांत हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसले आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अयोध्यात घडली आहे. लग्न समारंभात नाचताना एका 45 वर्षीय व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले असून दिलशाद असे या मयत व्यक्तीचे नाव असून तो राम नगर येथे वास्तव्यास होता.   

अयोध्यातील पतरंगा येथे पॅगंबर नगर गावात शेजारच्या लग्न समारंभात दिलशाद शामिल झाला नाच गाणे सुरु असताना दिलशाद हा 'खाई के पान बनारस वाला या गाण्यावर नाचत होता. नाचता नाचता तो अचानक जमिनीवर कोसळतो.तातडीनं लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तोंडावर पाणी टाकले तरीही तो शुद्धीवर येईना.त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 
 





Edited by - Priya Dixit