1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Babul Supriyo

बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर हल्ला

बाबुल सुप्रियो
आसनसोलमध्ये केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. यावेळी जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक देखील करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाल्याचे समजते.

बाबुल सुप्रियो हे भाजप कार्यकर्त्यांसोबत निघाले होते. तेव्हा तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी घेरले. दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरु होती. यात वाद वाढत जाऊन हाणामारी पर्यंत पोहोचला.

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर दगडफेक सुरु केली. दोन्ही पक्षाच्या या वादात अनेक जण जखमी झाले. तृणमूल हे गुंडगिरी करत असल्याचा आरोप बाबुल सुप्रियो यांनी केला आहे.
पुढील लेख
ऐ दिल... चा वाद वाढला, मनसेचे १२ कार्यकर्ते ताब्यात