गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

30 जूनच्या मध्यरात्री जन्म, नाव ठेवले जीएसटी

जयपूर- एखादी प्रसिद्ध व्यक्ती, घटना यांच्या नावांवरून नवजात मुलांचे नामकरण करणे नवीन नाही. नुकतेच लागू झालेली जीएसटी करप्रणाली सुद्धा याला अपवाद ठरलेली नाही. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी लागू करण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच राजस्थानमध्ये एका मुलाने जन्म घेतला.
 
देशातील करप्रणालीत झालेल्या क्रांतिकारी बदलाच्या ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आनंदीत झालेल्या आईने त्याचे नाव जीएसटी ठेवण्याचा निर्णय घेतला. राजस्थान येथील ब्यावर येथे शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी एका मुलाने जन्म घेतला. हा मुलगा आणि त्याच्या आईचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐतिहासिक क्षणी मुलाच्या जन्म झाल्याने आई आनंदीत दिसत आहे. तसेच या मुलाचे नाव जीएसटी असे ठेवत आईने मुलाचा जन्म अविस्मरणीय बनवला आहे.