बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (22:10 IST)

500 व 1000च्या नोटा बंद

५०० व १०००च्या चलनी नोटा बंद
नवी दिल्ली- सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा 8 नोव्हेंबर मध्य रात्रीपासून वापरातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये एक हजार आणि पाचशेच्या नोटा जमा कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले आहे. पुढील 50 दिवसांत म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत एक हजार आणि पाचशेच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसात जमा करता येतील.
भ्रष्टाचार आणि काळं धन हे देशासमोरचं मोठं आव्हान असून सीमेपलीकडून शत्रू खोट्या चलनी नोटांच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात. याव्यतिरिक्त योजनांमार्फत गरिबांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.