शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (15:16 IST)

बंदला संमिश्र प्रतिसाद

काँग्रेससह देशात विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानावरून मोदी सरकावर तोफ डागताना चौफेर हल्ला केला. यावेळी १६ विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. 
 
दरम्यान, भारत बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चेंबूर येथे ४०ते ४५ गाड्यांचा तोडफोड करण्यात आली. चेंबूर हायवेवर ट्रेलर आडवा घालून मुंबई -पुणे वाहतूक रोखण्यात आली. मनसे विभाग अध्यक्ष कर्णा दुनबळे व मनसे कार्यकर्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण माणीकराव ठाकरे, संजय निरूपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसने दिलेल्‍या भारत बंदला २१ राजकीय पाठिंबा दिला आहे.