बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (00:45 IST)

जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब छाव्याचा जन्म!

पृथ्वीच्या पाठीवरून नामशेष होण्याची भीती असलेल्या सिंहांना नवीन संजीवनी मिळाली आहे. आफ्रिकेतील एका प्राणी संग्रहालयातील सिंहीणीच्या मार्फत पहिल्या टेस्ट ट्यूब छाव्याला जन्म देण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हा अत्यंत अविश्र्वसनीय शोध असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या सिंहिणीने कृत्रिम गर्भाधारणाच्या माध्यमातून दोन छाव्यांना जन्म दिला. त्यातील एक नर आणि एक मादी आहे. प्रिटोरिया विद्यापीठातील तज्ज्ञांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. त्यांनी एका नर सिंहाच्या वीर्याचे रोपण सिंहिणीच्या आत केले आणि साडेतीन महिन्यांनंतर या सिंहिणीने दोन निरोगी छाव्यांना जन्म दिला आहे. उकुटुलु गे रिझर्व्ह अँड कन्झर्व्हेशन सेंटर येथे ही प्रक्रिया पार पडली. सिंहांच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडले आहे आणि आता आम्ही एक प्रवास सुरू केला आहे. आता आपले ज्ञान व समज सुधारून हे संशोधन वेगाने पुढे नेण्याची आमची इच्छा आहे, असे या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक डॉ. इसाबेल कॅलेल्टा यांनी सांगितले..