मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट

बॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या वाढदिवसाला आठवणी शेअर करत आहे तर तिची मुलगी जाह्नवी कपूर हिच्याकडे आपल्या भावना प्रकट करायला शब्द उरले नाहीत.
 
जाह्नवीने आपल्या आईच्या आठवणीत स्वत:च्या बालपणाचा फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती वडील बोनी कपूरसोबत आई श्रीदेवीच्या कड्यावर दिसतेय. विशेष म्हणजे या फोटोसह जाह्नवीने कुठलेही कॅप्शन दिलेले नाही. शब्दात व्यक्त न केलेल्या भावना देखील खूप काही सांगून जातात.
 
खरं तर बॉलीवुडमध्ये येण्यापूर्वी जाह्नवी आपल्या आईसोबत प्रत्येक इव्हेंट अटेंड करायची. तिचं संगोपन म्हणजे तिला जेवू घालणे, झोपवणे सर्व स्वत: श्रीदेवी करायची. अशात जाह्नवीला आईची कमी खूप जाणवत आहे.