पी व्ही सिंधू ने जिंकले रौप्य पदक, रचला इतिहास
देशाची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक हुकल आहे. मात्र तरी तिने इतिहास घडवला आहे. आशियाई क्रीड्या स्पर्धेच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळून भारताला रौप्य पदक मिळवणारी ती पहिला खेळाडू ठरली आहे. चिनी तैपईच्या ताइ जू यिंग हिच्याकडून पीव्ही सिंधू पराभूत झाली आहे. मात्र तिनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरल्यानं साऱ्या देशात तिचं कौतुक होत आहे.
चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. सिंधू आणि यिंग यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच यिंगचं पारडं जड होतं. आतापर्यंत यिंगने सिंधूला ९ वेळा पराभूत केलं आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती करणं तिला जमलं नाही. अंतिम सामन्यात यिंगने सिंधूचा केलेला पराभव हा तिचा १० वा पराभव ठरला आहे.