अबब, तब्बल ७७ वर्षांनी हरवलेले पाकिट सापडले
अमेरिकेतील रॉय रोट्स (१००) यांना हरवलेले पाकिट तब्बल ७७ वर्षांनी मिळाले. अमेरिकेमधील जॉर्जिया शहरात राहणारे रॉय रोट्स यांचे पैशाचे पाकीट दुसऱ्या युद्धात हरवले होते.
रॉय रोट्स यांनी सांगितले की, माझे सहाय्यक आणि मी सर्वजण विमानाने प्रवास करत होतो. त्याचदरम्यान माझ्या लक्षात आले की, माझे पाकीट कुठेतरी हरवले आहे. खुपवेळा शोधूनदेखील मला ते सापडले नाही. पुढे रॉय रोट्स यांचे हरवलेले पाकीट एडगर वॉरेन बर्ड्स या व्यक्तीला मिळाले होते. त्या पाकीटामध्ये रोट्स यांचे ड्रायव्हिंग लायसन्स होते. त्यानुसार त्यांचे पाकीट तो व्यक्ती रोट्स यांच्यापर्यंत पोहचवू शकत होता पण त्याने तसे केले नाही. अनेक वर्षे ते पाकीट जपूण ठेवले. पण त्याने असे का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरक्षित ठेवलेले ते पाकिट त्याने आपल्या मुलाला दिले. त्यानंतर मुलाने आपल्या मुलीला म्हणजेच वॉरेन बर्ड्स याच्या नातीला दिले. वॉरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातीने ते पाकीट रॉय रोट्स यांना परत दिले.